
पॅनोइंगमध्ये पुरुष संघ अंतिम फेरीत
हिंदुस्थानच्या पुरुष संघाने आपल्या हीटमध्ये तिसरे स्थान मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या फायनलसाठी पात्रता मिळवली आहे. नौचा सिंग, वरिंदर सिंग, ओइनम अरुण सिंग आणि हर्षवर्धन सिंग यांच्या हिंदुस्थानी संघाने 1ः29.447 सेपंदांची वेळ नोंदवली.
वीर चोत्रानी स्क्वॉशमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत
हिंदुस्थानच्या वीर चोत्रानीने पुरुष एकेरीच्या 32 जणांच्या फेरीत श्रीलंकेच्या शमिल वकीलचा सरळ गेममध्ये पराभव केला. वीरने 11-8, 11-3, 11-3 अशा विजयासह 16 जणांच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. हिंदुस्थानच्या तन्वी खन्नाने दक्षिण कोरियाच्या किम डामीचा सरळ गेममध्ये पराभव करून 11-5, 11-7, 11-5 अशा विजयासह 3-0 अशी निर्भेळ कामगिरी केली.
बॉक्सिंगमध्ये अंकुशचा दमदार विजय
पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुशने बहरीनच्या हमसा वोगेलचा 5-0 ने पराभव करून 16 जणांच्या फेरीत प्रवेश केला. या हिंदुस्थानच्या बॉक्सरने संपूर्ण लढतीत नियंत्रण राखले. अंतिम फेरीत अंकुशने शांतपणे खेळ करत आघाडी घेतली. थकलेला वोगेल या हिंदुस्थानी बॉक्सरवर एकही प्रभावी ठोसा मारू शकला नाही.
टेबल टेनिसमध्ये उपांत्यपूर्व फेरीत
हिंदुस्थानने टेबल टेनिसमध्ये आणखी एक उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले आहे. मिश्र दुहेरीमध्ये हिंदुस्थानी जोडी हरमीत देसाई आणि यशस्विनी घोरपडे यांनी हाँगकाँगच्या यु क्वान टो आणि एनजी विंग लॅम यांचा 3-1 ने पराभव केला. हिंदुस्थानच्या जोडीने हा सामना 11-6, 11-5, 10-12, 11-7 असा जिंकला. तिसरा गेम गमावल्यानंतर हाँगकाँगच्या जोडीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु हरमीत आणि यशस्विनी यांनी चौथा गेम जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
रोइंगमध्ये महिला संघ सहाव्या स्थानी
हिंदुस्थानच्या महिला पह्र संघाने आपल्या हीटमध्ये तिसरे स्थान मिळवून अंतिम फेरी ‘अ’ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. गुरबानी काwर, अलिना अँटो, टेंडेंथोई हाओबिजाम आणि पूनम यांच्या हिंदुस्थानी संघाने 6ः45.75 अशी वेळ नोंदवून एकूण सहावे स्थान पटकावले. पण अंतिम फेरीपूर्वी हिंदुस्थानच्या पदकाच्या आशा धूसर दिसत आहेत. चीन (6ः27.37), उझबेकिस्तान (6ः28.91) आणि व्हिएतनाम (6ः38.39) या सर्व संघांनी पात्रता फेरीत हिंदुस्थानपेक्षा चांगली वेळ नोंदवली आहे.



























































