
Asian Games मध्ये हिंदुस्थानच्या पुरुष बॅडमिंटन संघाने दमदार कागमगिरी करत कांस्य पदक पटकावले आहे. टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरीत जपानचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली होती. चीनविरुद्ध उपांत्य फेरीच्या लढतीत टीम इंडियाच्या खेळाडूंनी कडवी झुंज दिली. मात्र, त्यांची झुंज काहीशी कमी पडली आणि चीनने 3-1 अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. हिंदुस्थानचं या स्पर्धेतलं 12व पदक ठरलं आहे.
सामन्याच्या सुरुवातीला हिंदुस्थानच्या लक्ष्य सेनने चमकदार खेळ केला, परंतु शी युकीविरुद्धच्या संघर्षात त्याला 16-21, 18-21 ने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी लियांग वेइकेन्ग आणि वांग चांग यांच्यावर 21-11, 22-20 असा विजय मिळवून हिंदुस्थानला 1-1 अशी बरोबरी करून दिली, ज्यामुळे विजयाची आशा पल्लवीत झाली होती.
परंतु, तिसऱ्या सामन्यात आयुष शेट्टीला ली शिफेंगविरुद्ध 19-21, 13-21 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरच्या चौथ्या आणि निर्णायक सामन्यात एम. आर. अर्जुन आणि हरिहरन अमसाकरुणन यांच्या जोडीला जि टिंग आणि लियू यी यांच्याकडून 16-21, 21-17, -21 असे पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे चीनने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.


























































