IND U19 vs AUS U19 – वनडे मालिकेवर हिंदुस्थानचे निर्विवाद वर्चस्व, कांगारू चारीमुंड्या चीत; कर्णधार रायचंदानी चमकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट विश्वात सध्या हिंदुस्थानच्या नावाच दबदबा सर्वत्र पाहायला मिळत आहे. ऐशियन गेम्समध्ये महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावल, ऐतिहासिक सामन्या टीम इंडियाने जपानला धुळ चारली आणि आता हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन युवा संघाला चारीमुंड्या चित केलं आहे. उभय संघांमध्ये पार पडलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाच्या युवांनी धडाकेबाज कामगिरी करत मालिका 3-0 अशा फरकाने आपल्या नावावर केली. लक्ष्य रायचंदानीने कर्णधार म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद शतकही ठोकलं.

मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक सामन्यात हिंदुस्थानी युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाचे 255 धावांचे लक्ष्य अवघ्या 5 विकेट्स गमावून पार केलं. तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा डाव हिंदुस्थानी गोलंदाजांसमोर 49.3 षटकांत 254 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियन डावात सलामीवीर जॅड हॉलिकने 87 आणि नील पटेलने 51 धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज हिंदुस्थानी गोलंदाजीच्या माऱ्यापुढे टिकू शकले नाहीत, ज्यामुळे हिंदुस्थानला जिंकण्यासाठी 255 धावांचे लक्ष्य मिळाले.

या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर आर्यवीर सहवागने 31 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 34 धावांची जलद खेळी केली, परंतु तो मोठी धावसंख्या उभारण्यापूर्वी बाद झाला. त्यानंतर कर्णधार लक्ष्य रायचंदानीने एका बाजूने किल्ला लढवत अत्यंत जबाबदारीने फलंदाजी केली. त्याने 106 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 110 धावांची नाबाद शतकी खेळी करत हिंदुस्थानला 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून दिला.