मेट्रो पुलावरून लाकडी फळी कोसळून तरुण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काशिमीरा परिसरात सुरू असलेल्या मेट्रो-9 च्या बांधकामादरम्यान पुलावरून जड लाकडी फळी कोसळून 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी मेट्रो प्रकल्पातील स्टोअरकीपरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शादाब मन्सुरी (23) सायंकाळी 7.15 वाजता जुन्या जकात नाक्यासमोरील ओव्हरब्रिजच्या आडोशाला उभा होता. त्यावेळी अचानक ओव्हरब्रिजवरून जड लाकडी फळी कोसळून त्याच्या डोक्यावर आदळली. या दुर्घटनेत शादाब गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.