
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेनेच्या नावानेही धडकी भरल्याचे आज दिसून आले. दक्षिण मुंबईत शहा यांचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून पोलिसांनी शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवले होते. त्यावरून शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
अमित शहा यांच्या कार्यक्रमामुळे आज दक्षिण मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त होता. शिवसैनिक गनिमी काव्याने काहीही करू शकतात अशा भीतीपोटी सरकारने दक्षिण मुंबईतील शिवसैनिकांच्या घराबाहेर साध्या वेषातील पोलीस तैनात ठेवले होते. विभागप्रमुख संतोष शिंदे आज सकाळी आपल्या नैमित्तिक कामासाठी घराबाहेर पडले असता गाडीत बसण्यापासून पोलिसांनी त्यांना रोखले. लोकशाही हिंदुस्थानात माझ्याच गाडीत बसण्यास मला मज्जाव कसा केला जाऊ शकतो, मला कामावर जाण्यापासून रोखले कसे जाऊ शकते, अशी विचारणा करत शिंदे यांनी ही दादागिरी सहन करणार नाही असे पोलिसांना सांगितले. त्यावर अमित शहा यांचा कार्यक्रम संपून ते इथून गेल्यानंतर तुम्ही कुठेही जा असे सांगत पोलिसांनी शिंदे यांना दुपारी दीड वाजेपर्यंत कुठेही जाऊ दिले नाही.




























































