
राज्यातील सर्व शाळांमध्ये ई-कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती, संकलन आणि योग्य विल्हेवाटीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 28 ऑक्टोबर रोजी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागांतर्गत ‘इको क्लब्स फॉर मिशन लाइफ’ उपक्रमाच्या माध्यमातून हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. मोबाईल पह्न, संगणक, चार्जर, बॅटरी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची अयोग्य विल्हेवाट पर्यावरण व मानवी आरोग्यास हानीकारक ठरू शकते. त्यामुळे ई-कचऱयाचे योग्य वर्गीकरण, सुरक्षित संकलन, पुनर्वापर आणि अधिकृत पुनर्प्रक्रिया करण्यावर अभियानात भर दिला जाणार आहे.


























































