
विधान परिषदेच्या मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. गेली तीन टर्म आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांना धूळ चारत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रताप सिंह पाटील यांनी सर्वाधिक 73 हजार 931 मध्ये घेत आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार चव्हाण यांना 60 हजार 768 मते मिळाली आहेत.
पहिल्या पसंतीची मतमोजणी पूर्ण झाली असून विजयासाठी 88 हजार 558 चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार दुसऱ्या पसंतीची मते मोजली जात आहेत. दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल जो उमेदवार हा कोटा पूर्ण करेल त्याला विजयी घोषित केले जाणार आहे.
कोटा पूर्ण न झाल्यास सर्वाधिक मते असणारा उमेदवार आमदार म्हणून घोषित केला जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. गेल्या 26 तासांपासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रतापसिंह पाटील हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत. त्यांची ही आघाडी तिसऱ्या फेरी अखेरही विरोधकांना तोडता आली नाही. सध्या 13 हजार 163 मतांनी डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर असून त्यांना 14,627 मतं हवी आहेत.
मराठवाडा पदवीधर निवडणूक –
- एकूण मोजलेली मते – 1 लाख 77 हजार 115
- बाद मते – 16 हजार 540
- एकूण वैध मते – 1 लाख 93 हजार 655
- डॉ. प्रतापसिंह पाटील : 73931
- सतीश चव्हाण : 60768
- रविराज साबळे : 19835
- दिलीप घुगे : 8439
- विजयासाठी आवश्यक कोटा – 88559


























































