
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) वर जोरदार हल्ला केला आहे. काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी बीआरएसचे नेते काळी जादू करत आहेत, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला आहे.
रेड्डी यांनी बीआरएसचे आमदार टी. हरीश राव यांचे थेट नाव न घेता म्हटले की, एक माजी मंत्री कर्नाटक आणि
तामीळनाडूतील मंदिरात जाऊन तंत्र-मंत्र करत आहेत. राज्यात दुष्काळ पडावा, शेतकऱ्यांवर कर्ज व्हावे आणि काँग्रेसचे सरकार पडावे, यासाठी पूजा-अर्जा करत आहेत.
ज्या नेत्यांनी तामीळनाडू आणि कर्नाटकात जाऊन ज्या मंदिराचा दौरा केला आहे त्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा बीआरएसवर आरोप माहिती सोशल मीडियावर शेअर का नाही केली, याला गुप्त का ठेवण्यात आले, असा सवालही त्यांनी विरोधकांना विचारला आहे. हरीश रावत यांनी ज्या मंदिरात तंत्र-मंत्र केले त्याची माहिती सार्वजनिक करायला हवी.
बीआरएस नेते सत्तेसाठी इतक्या खालच्या पातळीवर घसरले आहेत की, ते आता राज्यात संकटे निर्माण व्हावी यासाठी काळी जादू करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावर बीआरएसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

























































