
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या राज्यव्यापी संघटनात्मक बांधणी मोहिमेला आज ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून प्रारंभकरण्यात आला. पदाधिकारी बैठकीत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि कोकण समन्वयक विजय कदम यांनी मार्गदर्शन केले. पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करणे, मतदार याद्या पुनरिक्षण, पदाधिकाऱ्यांमधील समन्वय आणि आगामी काळातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पक्षाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
शिवसेना नेते राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील चरईत तर कल्याण शीळ रोडवरील क्लासिक हॉटेल हॉल येथे कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि डोंबिवली जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उपनेते, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, संपर्क संघटक मृणाल यज्ञेश्वर, ठाणे जिल्हाप्रमुख मतदार याद्या पुनरिक्षणवर बारकाईने लक्ष द्या!
राज्यभर मतदार याद्यांचे पुनरिक्षण (एसआयआर) सुरू आहे. या मोहिमेत निवडणूक अधिकाऱ्यांच्या कामावर शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष देण्याची महत्त्वपूर्ण सूचना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली. आपल्या मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत याकडे लक्ष द्या. शिवाय नवीन मतदार नोंदणीच्या जनजागृतीकडेही लक्ष देण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, संदीप पाटील, मनोज इसवे, सुनील गव्हाणे, महेश कोटीवाले, जिल्हा संघटक रेखा खोपकर, जिल्हा सचिव सुभाष केसरकर, रमेश शेळके, आणतोनी सातन, शहरप्रमुख दीपक नलावडे, विजय वाळज, युवासेना जिल्हाप्रमुख दीपेश गावंड, विधानसभा संघटक हेमलता जोशी, उपजिल्हा संघटक श्रेया साळवी, कांचन लाड, स्मिता रोकडे, पुष्पा सोनवणे, शहर संघटक दीपा म्हात्रे, बाजीराव धोंड, रामदास जोशी, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, प्रमिला भांगे, अनिता प्रभू, गिरीश विचारे, तन्मय मणेरा, नगरसेवक विशाल ससाने, विशाल विचारे, कल्याण जिल्हा संघटक कल्पना कवळे, अंजली राऊत, युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रतीक पाटील, नीरज कुमार, जिल्हा संघटक रवींद्र सुर्वे, जिल्हा समन्वयक सुधीर पाटील, उपजिल्हाप्रमुख रोहिदास मुंडे, विलास म्हात्रे, विजय देसाई, राजेश डोंगरे, राजेंद्र साहू, नगरसेवक नीलेश खंबायत, वंदना महिले, किर्ती ढोणे आदी उपस्थित होते.



























































