
इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इस्लामाबाद शांती करारानंतरही दोन्ही देशांमध्ये पुन्हा वाजले असून आखातात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. अशातच इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकन सैनिकाची हत्या करणाऱ्या किंवा त्याला जिवंत पकडून देणाऱ्या व्यक्तीला 5 अब्ज तोमान (30 हजार डॉलर) बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा इराणचे लष्करप्रमुख अमीर हातमी यांनी केली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी या संदर्भातील वृत्त दिले असून ही कारवाई एखाद्या महिलेने केल्यास तिला दुप्पट रक्कमेचे बक्षीस देण्यात येईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
युद्धासाठी आर्थित मदत करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या मागणीनंतर ही योजना तयार करण्यात आली आहे. जो कुणी अमेरिक सैनिकाची हत्या करेल किंवा त्याला जिवंत पकडून इराणच्या ताब्यात देईल त्याला 30 हजार डॉलर (जवळपास 29 लाख रुपये) बक्षीस देण्यात येईल. एवढेच नाही तर एखाद्या इराणी महिलेने ही कामगिरी फत्ते केल्यास तिला दुप्पट रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा तेहरानमधील एका कार्यक्रमात बोलताना इराण अमीर हातमी यांनी केली.
Amir Hatami, Iran’s Army chief, announced a $30,000 reward, equivalent to around 5.6 billion tomans, for anyone who kills or captures a “US service member.” He said the reward would be doubled if an Iranian woman does so. pic.twitter.com/I27WjV99FP
— Iran International English (@IranIntl_En) August 16, 2026
अमेरिकन सैनिकावर हल्ला करण्यासाठी वापरलेले शस्त्र दुप्पट किमतीत खरेदी केले जाईल आणि त्याच्या बदल्यात संबंधित व्यक्तीला नवीन शस्त्र दिले जाईल. वापरलेले मूळ शस्त्र प्रस्तावित संग्रहालयात जतन करून ठेवले जाणार आहे, असेही हातमी यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधला.
इराणच्या पराभवानंतर हॉर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकेचा प्रांत घोषित केला जाईल, या ट्रम्प यांच्या विधानाचा हातमी समाचार घेतला. अमेरिकेचे लष्करी वर्चस्व आता संपुष्टात आले असून वॉशिंग्टनचा जागतिक प्रभाव कमी झाला आहे, असा दावा हातमी यांनी केला. आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांवरून इराणला धोका निर्माण झाल्यास ते पुन्हा सक्रिय होऊ दिले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.





























































