वाढलेले केस, दाढी असल्यास ‘नो एण्ट्री’, अयोध्येत पुजाऱ्यांसाठी ड्रेसकोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरातील पुजाऱ्यांसाठी नवीन ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. आता मंदिरातील सर्व पुजाऱ्यांना एकसारखे कपडे परिधान करावे लागतील. पुजाऱ्याचे जर डोक्यावरील केस आणि दाढी वाढलेली असेल तर अशा पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. हे नवीन नियम १५ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती मंदिरातील एका अधिकाऱ्याने दिली.

मंदिर न्यासच्या धार्मिक समितीचे सदस्य मिथिलेश नंदिनी शरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या नियमानुसार, आता पुजाऱ्यांना हलक्या पिवळ्या रंगाचे धोतर आणि त्याच रंगाचा रेशमी सदरा घालावा लागणार आहे. हलका पिवळा रंग हा भगवान राम यांच्या आवडीचा आहे. त्यामुळे हा रंग पुजाऱ्यांसाठी निवडण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, पुजारी एकतर पंचकेश परंपरेचे पालन करतील किंवा पूर्णपणे केस काढून टाकतील.

जास्त वाढलेले केस किंवा दाढी ठेवण्यास कोणत्याही पुजाऱ्यास परवानगी मिळणार नाही. तसेच पुजाऱ्यांना रामानंदी परंपरेचा टिळा लावणे बंधनकारक असणार आहे. वस्त्रांची पवित्रता आणि शुद्धता ध्यानात ठेवून रेशमी परिधान करणे याची निवड करण्यात आली आहे, असे धार्मिक समितीचे सदस्य महंत राजकुमार दास यांनी सांगितले.