
एसआयआरनुसार १७ऑगस्टपर्यंत मतदारांना गणना प्रपत्र भरून देता येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तीन दिवसांत बीएलए अथवा मतदारांना यादी तपासून बीएलओशी संपर्क साधावा लागणार आहे. हा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे रोल बॅक करणे व दावे-हरकती दाखल करण्याचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. एसआयआर प्रक्रियेत रोल बॅक करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी. दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ आहे. त्या कालावधीत दहीहंडी, रक्षाबंधन, गणेशोत्सव असल्याने एक महिना वाढवून द्यावा, असे कोंडविलकर यांनी नमूद केले आहे.

























































