थोडक्यात – वरळीत शिवसेनेचे रक्तदान शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना वरळी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शाखेच्या वतीने दरमहा १७ तारखेला या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा १६४ वे रक्तदान शिबीर पार पडणार आहे. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी नाका येथील शिवसेना शाखेत दरमहा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिवसेनाप्रमुखांचे १७नोव्हेंबर २०१२ रोजी महानिर्वाण झाल्यानंतर त्यांना अभिवादन करण्यासाठी दर महिन्याच्या १७ तारखेला हे रक्तदान शिबीर पार पडते. त्यामुळे इच्छुक रक्तदात्यांनी १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान करण्याचे आवाहन आयोजक अरविंद भोसले यांनी केले आहे. संपर्क : ९८२१५८१८६०.

जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धा
मुंबई : परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळ व शिवराज प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हास्तरीय ‘सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धा’ व ‘गणराज चषक’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या स्पर्धेचे २६ वे वर्षे असून त्यात कुलाबा ते दहिसर-मुलुंड भागातील स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे.

शिवसेना सचिव व मंडळाचे संचालक सुधीर साळवी, आमदार महेश सावंत, नगरसेविका उर्मिला पांचाळ व मंडळाचे संस्थापक आनंद गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. संतोष कांबळी, मुकेश कोळी, प्रणव डामरे, अभिषेक गवाणकर, रूपेश कोचरेकर, संजय तोडणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. संपर्क : नाना फाटक ९८१९३०१९५९, प्रभाकर मोरजकर ९९३०९१२२५५, रवींद्र ओटवकर ९८२०७४९१२६, अथर्व सावंत ९६१९१८८९८९.