प्रकल्प परत आणा! अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेदांता ग्रुपचा प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातकडे नेऊन महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा हा डाव आहे. यामधून मोठय़ा प्रमाणावर महाराष्ट्राला मिळणाऱया जीएसटीला मुकावे लागेल. त्यामुळे हा प्रकल्प राज्यातच राहावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती या पत्राद्वारे पवार यांनी केली आहे.