
हिंदुस्थानातील ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलीस यांनी ट्विटरवर अनोखा पोल घेतला. हा पोल डोसा खाण्यासंदर्भातील होता. हिंदुस्थानींना उद्देशून अॅलेक्स एलीस यांनी विचारले की, तुम्हीच सांगा की, मी डोसा कसा खाऊ? नाईफ की फोर्कने! या पोलला हजारो हिंदुस्थानींनी प्रतिसाद दिला. तब्बल 92 टक्के लोकांनी सांगितले की, डोसा हातानेच खा!! मग काय, काटा-चमचा न घेता अॅलेक्स यांनी हाताने डोसा खाल्ला.
डोसा खातानाचा व्हिडियो अॅलेक्स यांनी ट्विटरवर शेअर केला. व्हिडियोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘‘होय, 92 टक्के हिंदुस्थानी अगदी बरोबर आहेत. डोसा हातानेच खाल्ल्यावर उत्तम लागतोय. एवढेच नव्हे तर पुढे त्यांनी कॅप्शनमध्ये ‘एकदम मस्त’ असेदेखील लिहिले आहे.
अॅलेक्स एलीस यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट केल्या. अनेकांनी डोशाव्यतिरिक्त त्यांना साऊथच्या पदार्थांची यादीच दिली आहे.



























































