
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे उद्यापासून दोन दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानपदी आल्यानंतर स्टार्मर यांचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा असून या दौऱ्यात ते हिंदुस्थान व ब्रिटनमध्ये झालेल्या मुक्त व्यापार कराराच्या विविध पैलूंवर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह स्टार्मर हे मुंबईत होणाऱ्या सहाव्या ग्लोबल फिनटेक महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यानंतर गुरुवारी दोन्ही नेते उद्योग व व्यापार विश्वातील प्रतिनिधींना संबोधित करतील.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी मुंबईत भेट होणार आहे. त्यानिमित्ताने दोन्ही देशांतील मैत्री आणि सहकार्याचे प्रतीक म्हणून मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर दिव्यांच्या रोषणाईतून हिंदुस्थान व ब्रिटनचे राष्ट्रध्वज साकारण्यात आले आहेत.