वारजे पोलीस ठाण्यातून पळालेला आरोपी दारु गुत्त्यावर सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वारजे येथे घडली होती. याप्रकरणी वारजे पोलिसांनी 28 वर्षांच्या तरूणाला अटक केली होती. मात्र तो शनिवारी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्यामुळे वारजे पोलिसांची धावपळ उडाली होती. सर्व परिसर पिंजून काढल्यानंतर संबंधीत आरोपी रविवारी एका दारु गुत्त्यावर आढळून आला.

आरोपीने चार वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आवाजामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. त्यानंतर वारजे पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

दत्तवाडी पोलीस ठाण्यातूनही मनोरुग्ण पळाला
दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मनोरुग्ण तरुणाने रुग्णवाहिका अडवून तब्बल दोन तास धिंगाणा घातला होता. रस्त्यावरील दगड उचलून वाहनांवर मारण्याचा प्रयत्न करत होता. लसीकरणासाठी लस पोहचवणाऱ्या रुग्णवाहिकेचा ताबा घेतल्याने मोठा बिकट प्रसंग उद्भवला होता. वाहतूक पोलिसांनी त्याला पकडून दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र तेथून तो पसार झाला.