बीएसएफच्या देखरेखीखाली सीमेजवळ शेतकऱयांनी कसली जमीन

247

सांबा सेक्टर येथील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या शेतजमीनीवर नांगरणीसाठी बुलेटप्रूफ ट्रक्टरचा वापर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाककडून शस्त्र्ासंधीचे उल्लंघन होत असून सीमेलगत राहणाऱ्या गावकऱयांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सीमेलगत असलेल्या शेतीसाठी खास बुलेटप्रूफ ट्रक्टर खरेदी करण्यात आले असून बीएसएफ जवानांच्या देखरेखीखाली स्थानिक शेतकरी या ट्रक्टरद्वारे नांगरणी करीत आहेत.

यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान पाककडून नियंत्रण रेषेवर 950 वेळा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 79 वेळा संघर्ष विरामचे उल्लंघन करण्यात आले. यंदा या घटनेत 50 टक्क्यांनी वाढ झाली. एलओसीवर सेनेचे जवान तैनात असतात तर जम्मू येथील आंतरराष्ट्रीय सीमेची देखरेख बीएसएफचे जवान करतात. 90 च्या दशकात खलिस्तान आंदोलनात सर्वप्रथम पंजाब पोलिसांनी बुलेटप्रूफ ट्रक्टरचा वापर केला होता. बुलेटप्रूफ ट्रक्टरच्या मदतीने त्यावेळी 15 फूट उंच उसाच्या शेतात लपलेल्या खलिस्तानी दशहदवाद्यांना कंठस्नान देण्यात आले होते.

घुसखोरीसाठी सतत गोळीबार

संरक्षण मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा पाकिस्तानने 2 हजार 300 वेळा संघर्ष विरामचे उल्लंघन केले आहे. 2018 साली 1 हजार 629 वेळा संघर्ष विरामचे उल्लंघन करण्यात आले. तर 2017 मध्ये 860 तर 2016 मध्ये 228 वेळी पाकिस्तानकडून संघर्ष विराम तोडण्यात आला होता. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार दहशदवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाककडून सतत गोळीबार केला जातो. गृह मंत्रालयाच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार 2018 साली घुसखोरीच्या 328 घटना उघडकीस आल्या होत्या यातील 143 वेळा दहशतवादी सीमा पार करण्यात यशस्वी ठरले होते.

कश्मीरमधील ग्राहकांसाठी एसएमएस सेवा सुरू

खोऱ्यातून कलम-370 हटविण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूकश्मीर लडाख येथील मोबाईलधारक ग्राहकांची मोबाईल सेवा 5 ऑगस्टपासून थांबविण्यात आली होती. मात्र मंगळवारपासून मोबाईलच्या ग्राहकांची एसएमएस सेवा सुरू झाली आहे. यात फक्त वेगवेगळ्या बँकांकडून पाठवल्या जाणाऱ्या आणि बिझनेससंबंधी मेसेजेसचा समावेश आहे, असे अधिकाऱयांनी स्पष्ट केले. मोबाईलद्वारे संदेश पाठवून समाजविघातक क्रिया होऊ नयेत यासाठी मोबाईल सेवा ठप्प करण्यात आली होती. आता मशीन्सद्वारे

आपली प्रतिक्रिया द्या