
हिंदुस्थान बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पाच हजारांहून अधिक बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. सीमेवर शत्रूकडून होणारे हल्ले आणि हिंदुस्थानात घुसखोरी करणाऱया बांगलादेशींचे फो आणि व्हिडीओ पुरावा म्हणून गोळा करून सर्व डेटा परदेशी नोंदणी कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे.
तब्बल 4 हजार 96 किलोमीटरच्या सीमेवर बीएसएफच्या काही निवडक चौक्यांनाही बांगलादेशींच्या बायोमेट्रिक्स म्हणजेच फिंगरप्रिंट आणि आयरीस स्पॅन रेकॉर्ड करण्यासाठी उपकरणे देण्यात आली आहेत. जेणेकरून सर्व डेटा परदेशी नोंदणी कार्यालयाला पाठवून बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करता येईल, अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नाईट व्हीजन कॅमेऱ्यांद्वारे 14 तासांचे रेकॉडिंग
नाईट व्हीजन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल 12 ते 14 तासांचे रेकॉडिंग करता येणार आहे. घुसखोरांसह अमली पदार्थ, बनावट हिंदुस्थानी चलनाची तस्करी रोखण्यासाठी बीएसएफने पावले उचलली आहेत. अनेकदा गुन्हेगारांकडून, घुसखोरांकडून बीएसएफ जवानांवर हल्लेही होता. त्यासाठी बीएसएफ जवानांना अधिक सक्षम करण्यात येत आहे.