भारत-बांगलादेश सीमेवर 2.42 कोटींचे सोने जप्त

भारत-बांगलादेशच्या उत्तर 24 परगना सीमेजवळ 2.42 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात बीएसएफच्या जवानांना यश मिळाले. लक्ष्मीपूर सीमा आऊटपोस्टवर 67 व्या बटालियनच्या जवानांनी तस्करी करणाऱया टोळीला रंगेहाथ पकडले. दोन किलो 451 ग्रॅम वजनाचे सोने असून याची बाजारभावानुसार 2.42 कोटी रुपये किंमत आहे. जवानांना दोन दिवसांपूर्वीच या तस्करीची सूचना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.