तस्करी करणारा पाकिस्तानी ड्रोन BSF ने पाडला, हाती लागले 9 पॅकेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pakistan-drone

हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर पाकिस्तानकडून कुरघोडीचे प्रकार सुरू असतात. शस्त्रसंधीचे उल्लंघन, घुसखोरीचे प्रयत्न पाकिस्तानकडून केले जातात. आता पाकिस्तानकडून ड्रोनच्या सहाय्याने तस्करीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हिंदुस्थानच्या सतर्क जवानांनी ड्रोनच्या हालचाली लक्षात घेत त्याला टिपले. या ड्रोनमध्ये 9 पॅकेट्स सापडले आहेत.

बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानच्या ड्रोनद्वारे तस्करीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला. सीमेवर सतर्क असलेल्या बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानकडून येणाऱ्या ड्रोनवर गोळीबार करून तो पाडला. ड्रोनमध्ये 9 पॅकेट होते, अशी माहिती बीएसएफच्या पंजाब फ्रंटियरने दिली आहे.