
हिंदुस्थान सरकारची मालकी असलेल्या टेलिकॅाम ऑपरेटर BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ने आपल्या ग्राहकांना आर्थिक वर्षाच्या शेवटी एक नवी सेवा उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.
भारतीय टेलिकॅाम दुसऱया खासगी कंपन्यातून डेटा सेवाच्या मदतीने महसुल गोळा करत आहे. बीएसएनएल कडे 4G नव्हते, त्यामुळे ग्राहक कमी झाले होते . परिणामी कंपनीला तोटा सहन करावा लागला. दरम्यान, बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार यांनी सांगितले की,या वर्षाच्या शेवटी 4G स्पेक्ट्रम चे वाटप होईल. तसेच 2020 पर्यंत 4G सेवा सुरू करू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
2009 च्या नंतर बीएसएनएल फार तोट्यात गेली. 2018-2019 मध्ये कंपनीला 14,000 कोट्यवधीपेक्षा जास्त नुकसान झाले. कंपनीला मजबूत स्थिती वर पोहचण्याची रणनीति ऑक्टोबर महीन्या पासून चालू आहे.
दूरसंचार क्षेत्र एक आव्हानात्मक टप्प्यातून जात आहे. सर्व वापरकर्त्यांनी बीएसएनएल सेवा कमी केल्याने कंपनीला आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक होत गेले. त्यामुळे नवीन आव्हान योजनाद्वारा हे सोडविले जाईल. असे पूरवार यांनी सांगितले.
























































