
सामना ऑनलाईन । मुंबई
स्वस्त इंटरनेट आणि अनलिमिटेड व्हाईस कॉल यांच्या स्पर्धेत आता बीएसएनएल ही टेलिकॉम कंपनीही उतरली आहे. बीएसएनएलने ७५ रुपयांची आकर्षक ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, १० जीबी डेटा आणि ५०० एसएमएस मिळणार आहेत. या नक्या रिचार्ज पॅकची वॅलिडिटी १५ दिवसांची असून १५ दिवसांनंतर ग्राहकांना ९८ रुपये किंवा त्याहून जास्त किमतीचे रिचार्ज करावे लागेल. या रिचार्जनंतर आणखी १८० दिवसांची वैधता वाढवून मिळणार आहे. याआधी बीएसएनएलने जिओच्या १९८ रुपयांच्या प्लॅनला पर्याय म्हणून १७१ रुपयांचा प्लॅन आणला होता. बीएसएनएलच्या या नव्या प्लॅनमध्ये युजर्सला एका महिन्यासाठी ६० जीबी म्हणजेच दरदिवशी २ जीबी ३ जी डेटा मिळेल असे सांगण्यात आले होते.



























































