
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आणि पोस्ट ऑफिस यांनी एका करारावर स्वाक्षरी केली. या नव्या करारांतर्गत आता बीएसएनएलचे सिमकार्ड पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल. सिमकार्डसोबत कार्डची विक्री आणि रिचार्ज सुविधासुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहे. देशातील 1.65 लाख पोस्ट ऑफिसमध्ये बीएसएनएलचे सिमकार्ड आणि टॉप अप सेवा मिळतील. पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर पोस्ट ऑफिसने हा निर्णय घेतला आहे. बीएसएनएलने नुकतेच आत्मनिर्भर भारतसाठी देशभरात मेक इन इंडिया, अत्याधुनिक 4 जी मोबाइल सेवा नेटवर्कवर काम केले आहे.