#Budget 2020 शेतकऱ्यांसाठी 16 सूत्री कार्यक्रम

655

– कृषीक्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी 16 सूत्री कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये 2020-21 मध्ये शेती कर्जासाठी 15 लाख कोटी रुपयांची घोषणा केली. किसान क्रेडिट कार्ड योजनेत पीएम-किसानच्या लाभार्थींचा समावेश असणार आहे.
– 100 जिह्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून सोलारपंप दिले जाणार. यात 20 लाख शेतकऱयांना जोडणार. 15 लाख शेतकऱयांना ग्रीडपंप देणार.
– 162 दशलक्ष टन क्षमतेचे वेअर हाऊस, कोल्ड हाऊस, स्टोरेजेस उभारण्याचे उद्दिष्ट आहे. नाबार्ड अंतर्गत ही उभारणी करणार.
– महिला शेतकऱयांसाठी धान्यलक्ष्मी योजना आणणार. यामुळे बियाणांचे संवर्धन होईल.
– 2022 पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार.
– शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीपीपी’ तत्त्वावर खास किसान रेल्वे सुरू करणार. तसेच शेतमालाची निर्यात वाढविण्यासाठी कृषी उड्डाण योजना राबविणार.
– सेंद्रिय खत, सौरऊर्जा पंप, शेतीवर गुंतवणूक वाढवून झीरो बजेट शेतीवर सरकारचा भर.
– एक वस्तू, एक जिह्यावरही भर.
– पाण्याची कमतरता असणाऱया 100 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये पाणी नियोजनासाठी विशेष भर.
– पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱयांना सोलारपंप देणार.
– दूध, फळे, मांस, मासे यांच्या वाहतुकीसाठी प्रोत्साहन.
– फळबाग विकासासाठी योजना.
– 2022-23 पर्यंत मत्स्य उत्पादन 200 लाख टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट. 3455 सागर मित्र आणि 500 मत्स्य उत्पादन गट स्थापन करणार. त्यामुळे समुद्र किनारपट्टी भागात रोजगार वाढेल. यातून ब्ल्यू इकॉनॉमिला प्रोत्साहन मिळेल.
– कृषी, जलसंधारण आणि संबंधित क्षेत्रासाठी 2020-21 मध्ये 1.60 लाख कोटींची तरतूद. ग्रामविकासासाठी 1.23 लाख कोटींची तरतूद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या