आयात शुल्क वाढणार; बजेटनंतर किमान 50 वस्तूंची दरवाढ होणार

467

आर्थिक मंदीचा मोठा फटका सरकारी तिजोरीला बसला आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्कामध्ये 5 ते 10 टक्के वाढ होऊ शकते. यामुळे किमान 50 वस्तूंचे दर भडकणार आहेत.

आयात शुल्कामध्ये वाढ केल्यास चीनसह इतर देशातून येणाऱया वस्तूंचे दर वाढतील. सुमारे 56 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात होतात. यावर परिणाम होईल असा सरकारचा अंदाज असला तरी यात कितपत फायदा होईल याबाबत शंका आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 5 ते 10 टक्के आयात शुल्कवाढीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज आहे.

या वस्तूंचे दर भडकणार

मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, केमिकल, हँडीक्राफ्ट अशा वस्तूंची मोठी दरवाढ बजेटनंतर होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या