
देशभरात मंदीची लाट, बेरोजगारी अशा परिस्थितीत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान या सरकारसमोर आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होत असताना राज्यातही मंदीचा परिणाम होऊ नये यासाठी उद्योगांना चालना देणारा, शेतकरी, तरुण, विद्यार्थी तसेच उद्योजकांमध्ये चांगला संदेश जाईल असा चांगल्यातला चांगला अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ज्या शेतकऱ्यांना 1 एप्रिलनंतर कर्जमुक्ती देण्यात येईल त्यांच्यासाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.




























































