
कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारचा बुलेट प्रकल्प रखडला असून एक लाख 10 हजार कोटींच्या या प्रकल्पाची किंमत वाढणार आहे. मुंबई ते अहमदाबाद असा वेगवान बुलेटचा 508 कि.मी.चा मार्ग टाकण्यासाठी जपानच्या जायकाने एक टक्के व्याजाने 88000 कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाच्या अटी आणि शर्थीमध्ये जरी बदल होणार नसला तरी प्रत्यक्षात टेंडर काढताना या प्रकल्पाचा अंदाजित खर्च वाढणार असल्याची म्हटले जात आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता असली तरी कर्ज पुरवठादार कंपनी जायका (जापनीझ इंटरनॅशनल को-ऑपरेशन लिमिटेड) कर्जाच्या अटी आणि शर्थीमध्ये आता कोणताही बदल करेल असे काटत नसल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी म्हटले आहे.

























































