
बंद घरे शोधून परिसराची रेकी करायची. मग नशा करून ज्या घराच्या दरवाजाला टाळे आहे त्या घराला लक्ष्य करायचे. खबरदारी म्हणून शेजारील घरांच्या दरवाजांना बाहेरून कडय़ा लावून बंद घरात चोरी करणारी दुकली टिळकनगर पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यातील एका गुन्हेगारावर विविध पोलीस ठाण्यांत नशेत धुंद होऊन घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
चेंबूर येथील सेवांनगर रधपुंज बिल्डिंगच्या बाजूला राहणाऱ्या निशा यादव (36) यांच्या बंद घरात चोरी झाली होती. निशा यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात नशेत धुंद होऊन घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यावर सपोनि राहुल वाघमारे, उपनिरीक्षक श्रद्धा पारसे तसेच शिंदे, साटेलकर, सानप, रोंगटे या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपी ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरील दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सरकारी सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी केली. तेव्हा आरोपींनी कुर्ला सिग्नल येथील मास डेव्हलपरच्या समोर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पार्क करून ठेवल्याचे निष्पन्न झाले. म्हणून पोलिसांनी दोन दिवस त्या दुचाकीवर पाळत ठेवली.
मोईनुद्दीन निजामुद्दीन शेख (44) आणि हैदराबाबू शेख (23) हे दोघे ती दुचाकी घेण्यासाठी आले असता पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घातली. तेव्हा दोघेही नशेत होते आणि नशेत धुंद होऊन घरफोडी करायला जायच्या तयारीत होते. वेळीच त्यांना पकडल्याने नशेत धुंद होऊन घरफोडीचा गुन्हा होण्यापासून रोखता आला. दोघांनाही पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केल्यावर त्यांनी टिळकनगर येथील दोन, भायखळा व पंतनगर येथे केलेल्या नशेत धुंद होऊन घरफोडीच्या गुह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीदेखील त्यांनी चोरलेली होती. मोईनुद्दीन हा सराईत चोरटा असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत घरपह्डीचे गुन्हे दाखल आहे.

























































