
मुंबईची चाळ संस्कृती जोपासत सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवणाऱया गिरणी कामगार आणि त्यांच्या पुटुंबीयांना पुन्हा या क्षेत्रात नव्याने उभारी देण्यासाठी भायखळा येथे अद्ययावत सामाजिक, कला, क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंगळवार, 5 जानेवारीला फेरबंदर येथे सकाळी 11 वाजता संकुलाचे भूमिपूजन होणार आहे.
संकुलात तरुण-तरुणींसाठी सुसज्ज व्यायामशाळा, इनडोअर गेम, समाज कल्याण केंद्र, वाचनालय, पाळणाघर, कलादालन आणि बालवाडी या सुविधा मिळणार आहेत. शिवसेना भायखळा विधानसभा-शाखा क्रमांक 208, ए, बी आणि ई प्रभाग समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे यांच्या प्रयत्नाने ही वास्तू उभी राहत आहे.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, उपनेते सचिन अहिर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार यामिनी जाधव, अजय चौधरी, विधानसभा समन्वयक बबन गावकर, नगरसेविका सोनम जामसूतकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.





























































