
सी. रामचंद्र यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या भावस्पर्शी संगीताने हिंदुस्थानी संगीतविश्वाला अनेक सुवर्णक्षण दिले. त्यांच्या अविस्मरणीय गीतांची सुरेल मैफील अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘ये जिंदगी उसी की है’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा कार्यक्रम 6 मार्च रोजी विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह येथे रात्री 8.30 वाजता होईल. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. या मैफिलीत सी. रामचंद्र यांच्या गाजलेल्या गीतांचा सुरेल प्रवास अनुभवी गायक-वादकांच्या सादरीकरणातून उलडगणार आहे. प्राजक्ता सातर्डेकर, जय आजगावकर, सौम्या वर्मा गीते सादर करतील. संगीत संयोजक प्रशांत लळित यांचे तर निवेदन मंदार खराडे यांचे आहे. ध्ननिव्यवस्था बाबू शेटगे यांची आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले.





























































