सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधापृष्णन यांनी आज राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात राज्यपालपदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र पुमार उपाध्याय यांनी राधापृष्णन यांना शपथ दिली. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी राधापृष्णन झारखंडचे राज्यपाल होते. तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभारदेखील त्यांनी सांभाळला होता.