
हिंदुस्थानात शांतता आणि सुव्यवस्था नांदतेय हे काहीजणांना पाहवत नाहीय. त्यामुळे ते घातपात करण्यासाठी नेपाळ व भूतानमार्गे देशात शिरण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. सशस्त्र्ा सुरक्षा बलाच्या (एसएसबी) 56 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शहा पुढे म्हणाले की, हिंदुस्थानचे नेपाळ आणि भूतानशी चांगले संबंध आहेत. पण तेथून घुसखोरी करणाऱयांमुळे या देशांशी आपले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. काही वाईट विचारांच्या प्रवृत्तींना हिंदुस्थानात शांतता नांदते आहे ते पाहवत नाही.























































