नागरिकत्व संशोधन विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला देशभरात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. या दोन गोष्टींना विरोध करणाऱ्यांना अल्पसंख्यकांना भाजप आमदाराने उघडपणे इशारा दिला आहे. जे विरोध करत आहेत त्यांना एका तासात संपवून टाकता येऊ शकते असे विधान भाजपच्या आमदाराने केले आहे. लीला राम गुर्जर असे या आमदाराचे नाव असून ते हरयाणातील कैथल येथून निवडून आलेले आहेत. कैथलमध्येच आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांने हे विधान केले आहे.
ये गांधी का हिंदुस्तान नहीं, मोदी और अमित शाह का हिंदुस्तान है अगर इशारा हो गया तो एक घंटे में सफाया कर देंगे – लीला राम गुर्जर, भाजपा विधायक, कैथल (हरियाणा) pic.twitter.com/0dF7Vay9jD
— Aadesh Rawal (@AadeshRawal) December 24, 2019
गुर्जर यांनी भाषणादरम्यान म्हटले की ‘ सध्याचा हिंदुस्थान हा जवाहरलाल नेहरूंचा नसून नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा हिंदुस्थान आहे. मियाँजी, हा हिंदुस्थान आता नरेंद्र मोदींचा आहे. एक इशारा जरी केला तर एका तासात संपवून टाकू ‘ हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गुर्जर यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की नागरिकत्व संशोधन कायदा हा नरेंद्र मोदी यांच्यामुळेच लागू होऊ शकला.
गुर्जर यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की जर मुसलमान हा विचार करत असतील की त्यांना देशाबाहेर काढले जाईल तर हे एख षडयंत्र आहे. नागरिकत्व संशोधन कायद्यामुशे असं काहीही होणार नाहीये. मात्र ज्यांनी अवैधरित्या देशात प्रवेश केला आहे त्यांना मात्र देशाबाहेर जावंच लागेल असं गुर्जर म्हणाले.

























































