नागरिकत्व हिसकावण्याची तरतूद कुठेय ती दाखवून द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारवर हल्लाबोल करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले. राहुलबाबा, सुधारित कायद्यात नागरिकत्व हिसकावण्याची तरतूद कुठेय ती दाखवून द्या असे आव्हान शहा यांनी राहुल गांधींना दिले. ‘काँग्रेस ऍण्ड कंपनी’ सुधारित कायदा अल्पसंख्याकांचे नागरिकत्व हिसकावणार असल्याची अफवा पसरवत असल्याचेही ते म्हणाले.

राहुल गांधींनी ‘एनपीआर’ आणि ‘एनआरसी’वरून मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यावर शहा यांनी पलटवार केला. देशातील सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी आधी स्वत: सुधारित नागरिकत्व कायदा समजून घ्यावा व इतरांनाही समजून सांगावा, अन्यथा खोटे आणि गैरसमज पसरवणारे राजकीय पक्ष व्होट बँकेच्या स्वार्थापोटी आपापसात लढायला लावतील असा हल्लाबोल त्यांनी काँगेसवर केला. 1950 सालचा नेहरू-लियाकत करार अपयशी ठरल्याने हा सुधारित कायदा आणल्याचे शहा म्हणाले.