दिवाळीच्या तोंडावर सरकारने फटाके फोडले, कोट्यवधी शेतकऱ्यांचा फायदा होणार

2534

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिवाळीआधी फटाके फोडत केंद्र सरकारने गहू, ज्वारी, हरभरा आणि सूर्यफुलासह रब्बी पिकांच्या हमीभावामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही वाढ 85 रुपये ते 325 रुपयांपर्यंत असणार आहे. याचा थेट फायदा देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना होणार आहे.

केंद्रसरकारने रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्याच्या निर्णयासोबत तोट्यात असणाऱ्या दूरसंचार कंपन्या बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला आहे. विलिनीकरणानंतर जन्माला येणारा कंपनीसाठी बॉन्डच्या माध्यमातून 15 हजार कोटी आणि संपत्ती विक्रीतून 38 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे, अशी ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे.

यासह मंत्रिमंडळाने 250 कोटींची उलाढाल असलेली कंपनी पेट्रोल आणि डिझेलची विक्री करू शकणार आहे. याआधी 2500 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्यात इंधनाची विक्री करू शकत होत्या. सरकारच्या या निर्णयामुळे आता मॉलमध्येही पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा लागल्याचे दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

आपली प्रतिक्रिया द्या