मोबाईल टॉवरवरील ४८ हजाराचे केबल चोरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

अहमदपूर तालूक्यातील किन्नीकदू येथील मोबाईल टॉवर वरील सुमारे ४८ हजार रुपयांची केबल चोरून नेल्याची घटना घडली.

या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात कनिष्ठ दुरसंचार अधिकारी दयानंद विठ्ठल चाफे कावडे रा. अहमदपूर यांनी तक्रार दाखल केली. तालुक्यातील मौजे किन्नीकदू येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवरील आरएफ केबल २४० मिटर (किंमत ४८,००० रुपये) अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.