लॉरेन्स बिष्णोईची खंडणीसाठी पंजाबी गायकाला धमकी, पैसे न दिल्यास जिवे मारू

प्रसिद्ध पंजाबी गायक बी प्राक याला लॉरेन्स बिष्णोई गँगने 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. 10 कोटी रुपये जर मिळाले नाहीत तर जिवे मारू, अशी धमकी बिष्णोई गँगने दिली आहे. बी प्राकचा सहकारी गायक दिलनूर याच्यामार्फत ही धमकी देण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई अशी करून दिली आहे. या धमकीत म्हटले की, बी प्राकला सांग की आम्हाला 10 कोटी रुपये हवे आहेत. तुझ्याकडे एक आठवडय़ाचा वेळ आहे. तू जगातील कोणत्याही देशात गेलास तरी तुझ्याशी संबंधित कोणीही आम्हाला सापडले तर आम्ही त्याचा बंदोबस्त करू. याला बनावट काॅल समजू नको, असे म्हटले आहे.