
केंब्रिजने मार्चमध्ये घेतलेल्या आयजीसीएसई, एएस आणि ए लेव्हलच्या परीक्षांचे निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर केले.
देशभरातील 420 शाळांमधील 17 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. तेंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट या इंटरनॅशनल एज्युकेशन ग्रुपतर्फे हिंदुस्थानात या परीक्षा घेतल्या जातात. केंब्रिजच्या परीक्षार्थींची संख्या गेली काही वर्षे वाढतेच आहे. त्यात भारतातील प्रवेश प्रक्रिया जूनमध्येच सुरू होत असल्याने गेल्या काही वर्षांत केंब्रिजने निकाल लवकर म्हणजे मे-जून दरम्यान जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
केंब्रिजकडून कला, विज्ञान, वाणिज्य शाखेशी संबंधित अनेक विषय नववीपासूनच उपलब्ध करून दिले जातात. मात्र भारतात गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांना पसंती मिळते. यंदा जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांची संख्या 16 टक्क्यांनी वाढल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. त्या खालोखाल बिझनेस आणि अर्थशास्त्रात विद्यार्थ्यांनी रस दाखविला आहे. 160 देशांमध्ये 10 हजारांहून अधिक शाळांमध्ये पेंब्रिजचे अभ्यासक्रम शिकविले जातात.