सेम टू सेम… रहाणे-राहुलला गावसकर बनण्याची संधी

18

सामना ऑनलाईन । ओव्हल

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकण्यासाठी हिंदुस्थानला 464 धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसअखेर हिंदुस्थानचा डाव 3 बाद 58 असा संकटात सापडला असल्याने सामना वाचवण्याचे आव्हान हिंदुस्थानपुढे आहे. सलामीवीर लोकेश राहुल 46 आणि रहाणे 10 धावांवर नाबाद आहे. हिंदुस्थानचा संघ अद्यापही 406 धावांनी पिछाडीवर असून 7 विकेट्स शिल्लक आहे.

IND VS ENG TEST : चौथ्या दिवसअखेर टीम इंडिया 3 बाद 58 धावा
हॉब्ज, हटन अन् कूक

चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात अँडरसन आणि ब्रॉडने टिच्चून मारा करत तीन बळी घेतले. सलामीवीर शिखर धवन 1, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली शून्य धावांवर बाद झाल्याने हिंदुस्थानवर पराभवाचे गडद सावट दिसत आहे. रहाणे आणि राहुलने डाव सावरत आणखी पडझड होऊ दिली नाही. परंतु पाचव्या दिवशी सामना वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. हे जवळजवळ अवघड वाटत असले तरी अशक्य नाही. कारण यापूर्वी देखील हिंदुस्थानने अशा कठीण परिस्थितीतून सामना वाचवला आहे.

पहिल्या व अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारे फक्त 5 खेळाडू, वाचा सविस्तर…

असाच एक सामना हिंदुस्थान आणि इंग्लंडच्या संघात याच मैदानावर 1979 मध्ये रंगला होता. इंग्लंडने दुसऱ्या डावात हिंदुस्थानपुढे 438 धावांचे आव्हान ठेवले होते. दबावात खेळताना हिंदुस्थानच्या फलंदाजांनी 8 बाद 429 धावा करत सामना वाचवला होता. पहिल्या डावात 202 धावांवर बाद झालेल्या हिंदुस्थानचा संघ दुसऱ्या डावात नेटाने लढला होता. हा सामना वाचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता सुनील गावसकर यांनी. गावसकर यांनी 490 मिनिट क्रिजवर उभे राहून 443 चेंडूंचा सामना केला. यात त्यांनी 21 चौकारांच्या मदतीने 221 धावांची खेळी केली आणि सामना वाचवला होता. सध्या इंग्लंडमध्ये हिंदुस्थानचा संघ अशाच कठीण परिस्थितीत सापडला असून गावसकर समालोचन करत आहेत, तर मैदानावर रहाणे आणि राहुल या जोडीवर सामना वाचवण्याची जबाबदारी आहे. त्या काळी गावसकर यांनी इतिहास घडवला होता आणि आता रहाणे-राहुलला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.

तर विक्रम होणार…
हिंदुस्थानने हा सामना वाचवण्यात यश मिळवले तर तो एक विक्रम असणार आहे. 1979 मध्ये हिंदुस्थानने सर्वाधिक धावांचा (438) पाठलाग करताना सामना वाचवला होता. आता हा सामना अनिर्णित राखला तर तो विक्रम मोडणार आहे. कारण या सामन्यात हिंदुस्थानपुढे 464 धावांचे आव्हान आहे. जो

तो विजय सुखावणारा
हिंदुस्थानने 1976 ला वेस्ट इंडिजविरुद्ध 403 धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला होता. हा सामना पोल्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला गेला होता. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक धावांचा पाठलाग करून विजय मिळवण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 418 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. कसोटी इतिहासामध्ये आतापर्यंत फक्त चारच वेळा चौथ्या डावात 400 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या