कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा कार डिझायनर तसेच डीसी डिझाईनचा प्रमुख दिलीप छाब्रिया एका फसवणुकीच्या गुह्यात अटकला आहे. त्याला गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने अटक केली आहे.

दिलीप छाब्रिया हा प्रसिद्ध कार डिझायनर आहे. त्याच्या विरोधात विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुह्यात छाब्रिया याला अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी छाब्रियाची कार देखील जप्त केली असून अधिक तपास सुरू आहे.