
कोणताही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो याची प्रचीती पुन्हा एकदा अमेरिकेत आली आहे. एका महिलेला भन्नाट आयडिया सुचली. तिने या आयडियाच्या जोरावर कार सिटिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. सिडनी शार्लोटने असे महिलेचे नाव असून तिने अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कार सिटिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. सिडनी काय करते, तर ती कोणाच्याही गाडीत एक तास ते दीड तास बसून राहण्यासाठी 50 डॉलर्स म्हणजेच 3500 रुपये आकारते. अनेक कार मालक सिडनीला हे पैसे देतात. न्यूयॉर्कमध्ये अल्टरनेट स्ट्रीट पार्किंग नावाचा एक नियम आहे. याअंतर्गत वाहनचालकांना दर आठवडय़ाला त्यांची वाहने रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलवावी लागतात, जेणेकरून रस्ता स्वच्छ करता येईल. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला 4500 रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल किंवा तुमचे वाहन ओढले जाईल.