
माहेरहून गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन यावेत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या 6 जणांविरुध्द उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पार्वती शिवशंकर तेलंगपुरे (रा.हैबतपूर, ता.उदगीर) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आळंदी देवाची जि.पुणे येथील मंगलकार्यालयात हैबतपूर येथील शिवशंकर धोंडीराम तेलंगपुरे याच्यासोबत लग्न झाले होते. शेतातील घरामध्ये काही दिवस ठेवल्यानंतर माहेरवरुन वडीलांकडून गाडी घेण्यासाठी 2 लाख रुपये घेऊन यावेत म्हणून शिवशंकर धोंडीराम तेलंगपूरे, धोंडीराम पुंडलीक तेलंगपुरे, मंजूळा धोंडीराम तेलंगपुरे, किरण धोंडीराम तेलंगपुरे, शरद धोंडीराम तेलंगपुरे यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. शारीरिक व मानसीक छळ केला. पैसे न घेता परत आली तर तुला व मुलाला ठार मारतो असे धमकावले. या तक्रारीनुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































