
डोक्यात वीट पडून संस्कृती अमीन या तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी विकासकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पाच दिवसांपूर्वी स्लॅब टाकण्यापूर्वी प्लायवुडचा भाग उडून एका घराच्या छतावर पडला होता अशी माहितीही समोर आली आहे. घडल्याप्रकरणी पोलीस विकासकाची चौकशी करणार आहेत.
जोगेश्वरी पूर्व मजासवाडी येथे बांधकामाधीन इमारतीवरून सिमेंटचा ब्लॉक डोक्यावर पडल्यामुळे संस्कृती ही गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी संस्कृतीच्या वडिलांनी याबाबत मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विकासकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.






























































