
शहरातील मध्यवर्ती शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पठण केल्याप्रकरणी तीन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारवाडा ऐतिहासिक स्मारक असून तिथे मनाई असताना तीन महिलांनी चटई अंथरूण नमाज पठण केले. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी उशिरा याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी प्राचीन स्मारके, पुरातत्वशास्त्रीय स्मारके आणि अवशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
खासदाराविरुद्ध गुन्हा नोंदवा; रूपाली पाटील-ठोंबरे
भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी काही कार्यकर्त्यांसह शनिवारवाड्याच्या आवारात रविवारी आंदोलन केले होते. त्यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजित पवार गटाच्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी केली.