
काही वर्षांपूर्वी फुटबॉल विश्वचषकात भविष्य सांगणारा पॉल बाबा म्हणजेच ऑक्टोपस लोकप्रिय झाला होता. आता रशियात सुरू असलेल्या युरो चषकादरम्यान भविष्यवाणी सांगणारी अशीच एक मांजर चर्चेत आली आहे. युरो चषकात चुरशीच्या सामन्यात कोणता संघ विजयी होईल याचे भाकीत ही मांजर सांगते. ऑचिली असे मांजरीचे नाव असून ती सेंट पिटर्सबर्गमधील हर्मिटेज म्युझियममधली आहे. तिचे भाकीत खरे ठरत असल्याने सर्वच अचंबित झाले आहेत.
ऑचिली मांजर मागील काही वर्षांपासून फुटबॉल सामन्यांचे भाकीत करत आहे. 2018 साली फिफा विश्वचषकातील सुरुवातीची मॅच रशिया जिंकेल, असे भविष्य ऑचिलीने सांगितले होते. यानंतर आता युरो चषकाच्या सामन्यादरम्यानचे तिचे व्हिडियो व्हायरल होत आहेत. युरो चषकाच्या पहिल्या मॅचमध्ये इटलीने टर्कीला पराभूत केले. त्यानंतर बेल्जियमने रशियाला हरवले. या सामन्यांचे भाकीतही ऑचिलीने आधीच केले होते, ते खरे ठरले. ऑचिलीची भविष्यवाणी करण्याची पद्धत वेगळी आहे. तिच्यासमोर दोन वाटय़ांमध्ये खाऊ ठेवला जातो. तसेच वाटीजवळ प्रत्येक संघाचा झेंडा असतो. त्यानंतर ही मांजर कोणत्याही एका वाटीतील खाऊ आधी खाते आणि तोच संघ विजयी होतो.


























































