मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कथित मद्य धोरण घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आधी ईडीने नंतर सीबीआयने त्यांना अटक केली होती. कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले होते. आता सीबीआयने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.

कथित मद्य धोरण प्रकरणी ईडीने पहिला गुन्हा दाखल केला होता. ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणी हा गुन्हा दाखल करून त्यांना 21 मार्चला अटक केली होती. पण लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी त्यांना जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि 16 जूनला त्यांना अटक केली होती. केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली होती. यावर आज सुनावणी होणार आहे.