
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीचे निकाल आज घोषित झाले. यात 99 पूर्णांक 37 शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी एकूण 13 लाख 4 हजार 561 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 12 लाख 96 हजार 318 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलींचं प्रमाण 99 पूर्णांक 67 शतांश टक्के इतकं तर मुलांचं प्रमाण 99 पूर्णांक 13 शतांश टक्के इतकं आहे.

























































