बुलढाणा : द चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेचा CBSE च्या परीक्षेत 100% निकाल

455

फेब्रुवारी 2020 मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई. बोर्डाकडून) घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल दिनांक 15 जुलै रोजी जाहीर झाला असून यामध्ये चिखली तालुक्यातील पहिली सी.बी.एस.ई. इंग्रजी माध्यमाची शाळा असलेल्या दि. चिखली अर्बन विद्यानिकेतनचे 33 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा 100% निकाल लागला आहे. या 33 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण संपादित केले असून एकूण 11 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत व या 33 पैकी 31 विद्यार्थ्यांनी 67% च्या वर गुण प्राप्त केले आहेत.

यामध्ये निखील संजय पाटील (जाफराबाद) या विद्यार्थ्याने 94.00% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला. तसेच स्नेहांकित निवृत्ती बनसोडे (जाफराबाद) व यश संतोष तरमळे, (चिखली) या विद्यार्थ्यांनी 93.4% मिळवून शाळेतून द्वितीय क्रमांक मिळविला तर प्रसन्न अशोक उगलमुगले (साखरखेर्डा) याने 93.00% मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. स्वराज सुजित महाजन (साखरखेर्डा) याने 92.8% व करण लक्ष्मण घुबे (देऊळगाव घुबे) 91.2% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या