दादर स्टेशनला नव्हे, मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी नाव; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या निर्णयावर प्रतिकूल प्रतिक्रिया उमटताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावरून ‘यू टर्न’ घेतला. दादर रेल्वे स्थानकाला नव्हे, तर दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यात येणार असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला.

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या प्रक्रियेची पूर्तता विधिमंडळाच्या  अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले होते. या निर्णयावरून गदारोळ उडताच मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’वर खुलासा करून वादावर पडदा टाकला.

नामांतराची मागणी जुनीच

चैत्यभूमी हे नाव देण्याची आंबेडकरी अनुयायांची मागणी जुनीच आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांच्या कारकिर्दीत ही मागणी पहिल्यांदा पुढे आली होती. त्यानंतर सातत्याने महापरिनिर्वाण दिनाच्या आसपास दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी करण्याची मागणी पुढे येत आहे.